महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी; आरोग्यमंत्री कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत!
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून परिस्थिती आटोक्यात येतानाची चिन्हं दिसून येत नाहीत. त्यातच भर म्हणून महाराष्ट्रात आज 15 हजार 51 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एकुण 10 हजार 671 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून आज पर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या 21 लाख 44 हजार 743 एवढी झाली आहे.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 92.7 टक्यांवर आलं आहे. सोमवारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण 1 लाख 30 हजार 547 सक्रिय रुग्ण असून आज पर्यंत 52 हजार 909 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आता तरी लोक नियमांचं पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये अंशतः लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे. तसेच, काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. परंतु, तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”
रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; अंमली पदार्थ विरोधी पथकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!
सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
“मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे”
दोन मुलांच्या बापाने केलं असं काही की कोर्टाने सुनावली 212 वर्षांची शिक्षा!
Comments are closed.