बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

मुुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

राज्यात आज 10,187 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 6,080 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,62,031 रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 92,897 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.36% झालं आहे.

एकट्या पुण्यात आज दिवसभरात 963 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 659 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 9 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील 5 रुग्ण पुण्याबाहेरील आहे. पुण्यात सध्या 321 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,73,046 इतकी आहे. तर पुण्यात 6460 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4885 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,96,001 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7609 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! आरोग्य अधिकाऱ्याने घेतली ‘कोरोना’ची लस अन् पाच दिवसातच…

आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव

रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस

बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More