Top News विधानसभा निवडणूक 2019

अयोध्येचा ऐतिहासिक निकाल उद्या लागणार; सगळ्या देशाचं निकालाकडे लक्ष

नवी दिल्ली |  ज्या अयोध्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय तो निकाल उद्या लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उद्या सकाळी 10.30 वाजता निकाल सुनावणार आहेत.

देशात सर्वात अतिसंवेदनशील असं अयोध्या प्रकरण आहे. गेल्या चाळीस दिवसात या प्रकरणाची जलद सुनावणी घेण्यात आली होती. आता उद्या हा निकाल लागतो आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली होती. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांततेचं आवाहन केलं जातंय. समाजातील लोकांना कोणत्याही परिस्थितीत जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या