नवी दिल्ली | उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. रविवारी ऋषिकुल येथील सरकारी पीजी आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित ‘नेत्र कुंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
अनेक देशांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी लाईनमध्ये उभे राहतात. यापूर्वीची स्थिती निराळी होती. जगातील कोणत्याच नेत्यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी फरकच पडत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता स्थिती बदलली आहे, असं रावत यांनी म्हटलं आहे.
यापूर्वीच्या काळात प्रभू श्रीराम यांनी समाजासाठी चांगलं काम केलं होतं आणि म्हणूनच लोकं त्यांना देव मानू लागले होते. याचप्रकारे भविष्यात आपल्या लाडक्या पंतप्रधानांसोबतही तसंच होईल, असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.
तीरथ सिंह रावत यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. रावत यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय सचिव, प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सपना चौधरींच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
“मी सुसंस्कृत घरातला, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे”
दोन मुलांच्या बापाने केलं असं काही की कोर्टाने सुनावली 212 वर्षांची शिक्षा!
नरेंद्र सिंह तोमर आणि राकेश टिकैत यांच्यात जुंपली, म्हणतात…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.