Top News

धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?- तृप्ती देसाई

पुणे | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

धनंजय मुंडे मला माझ्या मुलांशी भेटू देत नसल्याचा तसेच मुंडेंनी माझ्या मुलांना तीन महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे. यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांचा सत्कार करायला ते काय पराक्रमी योद्धा आहे का?, अशी बोचरी टीका तृप्ती देसाई यांनी मुंडेंवर केली आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

धनंजय मुंडे यांचं जल्लोषात स्वागत आणि सत्कार करणाऱ्यांची मानसिकता आपल्याला तपासावी लागेल. हे जर असंच सुरू राहिलं तर काही काळानंतर बलात्काराचे आरोप असलेला नेता आणि मंत्र्यांचे स्वागत करण्याचा चुकीचा पायंडा पडेल, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

एकीकडे आईचे आरोप तर दुसरीकडे… धनंजय मुंडेंच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

‘पोलिसांनी मला सहकार्य न केल्यास…’; करूणा शर्मा यांनी दिला ‘हा’ इशारा

रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मा; नव्या आरोपांनी धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरु होणार; उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

शरजील उस्मानी कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या