बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना, शिवसेनेतील गळती कायम

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली. तर आमच्यासोबत बहुमत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत आहे. त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक साद घालूनही शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली. आमच्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत असून शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना झाले आहेत.

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) व माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) गुवाहाटीसाठी रवाना झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र, हे दोन्ही आमदार सुरत येथून गुवाहाटीसाठी रवाना झाल्याचं आता समोर आलं आहे. या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला असून शिवसेनेची गळती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना परत येण्यासाठी आवाहन केलं आहे. शिवसेना महाविकास आघाडीला सोडण्यासाठी तयार आहे. बंडखोरांनी फक्त समोर येऊन चर्चा करा, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून बैठकींचा सिलसिला सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

“कॅरम खेळण्यापुरते सुद्धा आमदार उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहणार नाहीत”

आता पुढं नेमकं काय होणार?, गुवाहाटीतून शिंदे गटातील आमदाराचा मोठा खुलासा

सलग दुसऱ्या दिवशी ‘सामना’तून तोफ धडाडली, पाहा कुणाकुणाला दिलाय इशारा!

“आमदार फुटण्यामागे हे कारस्थान…”; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More