महाराष्ट्र मुंबई

कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच- उद्धव ठाकरे

मुंबई | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद  साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून सरकार जी टीका होत आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका. कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे.

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचं का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्राध्यक्षपद गेलं; आता बायकोही सोडून जाण्याच्या तयारीत?

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

अर्णब यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी सरकारची असेल- नारायण राणे

ज्या दिवशी अर्णब यांची सुटका होईल, त्याच दिवशी दिवाळी साजरी करू- राम कदम

अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात; पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या