महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?- उद्धव ठाकरे

मुंबई | शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी सीरियसली घेत नाही. त्यांची पवारांवर बोलण्याची लायकी काय आहे?, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना नाव न घेता लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दैनिक ‘सामना’साठी मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांना राजकारण, समाजकारण आणि प्रशासनाचा प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शन सुद्धा सरकारला आहे. तरीही भाजपचे नेते पवार हे अत्यंत कमी उंचीचे नेते असल्याचं सांगत आहेत, त्यावर तुम्हाला काय वाटतं?, असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता. याला उत्तर देत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

दरम्यान, कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी स्वतः ड्रायव्हिंग करतो- उद्धव ठाकरे

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू-उद्धव ठाकरे

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या