बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाबळेश्वरसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय

सातारा | राज्यात आणि देशातही  महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते.

उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करुन त्याला बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. महाबळेश्वर येथे केवळ भारतातून नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येत असतात. यासाठी महाबळेश्वर येथे एक संशोधन केंद्र उभे करण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे अनेक लोक येथे पर्यटनासाठी येत असतात आणि त्यामुळे वाहनांची समस्याही निर्माण होते. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरच्या परिसरात वाहनतळ उभारुन बॅटरी किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता येईल का हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री तीन दिवसाच्या महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कृषी विभागाला भेट दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

…म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही!

महत्वाच्या बातम्या-

आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांचं जोरदार पत्युत्तर

डीपनेकवरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाच्या आईचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More