बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”

मुंबई | केंद्र सरकार सरकरी कंपन्यांचं खासगीकरण करणार असल्याचं कंपन्यांना वाटत असल्यामुळं शेअर मार्केट वर गेेले आहे.  मात्र, केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

कोरोना काळात शेअर मार्केट खेळण्यासारखं झालं होतं. मात्र आता ते सावरलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारने कोरोनानंतर आपलं पहिलं बजेट सादर केलं आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत 19,76,424 लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगलं बजेट मांडलंय असं वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. तसंच लॉकडाऊनमुळे ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावं लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही आंबेडकरांनी केंद्र सराकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ वक्तव्य केलं- अजित पवार

नवरा दलित आहे म्हणून आई-वडिलांनी गरोदर मुलीसोबतच केलं हे धक्कादायक कृत्य

वसुलीसेना?; मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून फेरीवाल्यांकडून फाडल्या जातायेत पावत्या

अमित शहांचे पूत्र कुठल्या आधारावर BCCI चे सचिव झाले?; मोदींचा सवाल

उपमुख्यमंत्री बदलण्याचा प्रस्ताव?; अजित पवार म्हणतात…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More