बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘या’ जागेवर आम्ही स्वबळानेच लढणार”; अजित पवारांना विजय वडेट्टीवारांचं आव्हान!

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरची जागा आमदार दत्तात्रय भरणे यांना देण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे ही जागा अजित पवारांसाठी किती महत्त्वाची आहे?, याची चर्चा सध्या इंदापुरमध्ये सुरु आहे. मात्र अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना डिवचण्याचा काम केलं आहे. काँग्रेस स्वतःच्या बळावर लढणार असून कोणत्याही परिस्थितीत इंदापूर विधानसभेची जागा सोडणार नसल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

याआधी इंदापूरचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल अशी शंभर टक्के शाश्वती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली होती. पटोलेंचं हे वक्तव्य ताज असतानाच विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या जागेवरचा हा वाद जुनाच आहे. अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची की काँग्रेसची यावर वाद निर्माण झाला होता. एवढंच काय तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन देखील दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी दोन्ही पक्षाची आघाडी निवडणुकीपूर्वीच तुटेल की काय, असं चित्र निर्माण झालं होतं.

दरम्यान, दत्तात्रय भरणे यांना अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाते. तर हर्षवर्धन पाटील हे त्यांचे कट्टर विरोधक आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी 2019च्या निवडणुकीआधी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.

थोडक्यात बातम्या-

ॲाडी कारला भीषण अपघात, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

‘काही पक्षांना जनतेमध्ये बेस नाही म्हणून…’; राऊतांचा मनसेवर निशाणा

‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कुंडलिका नदीला पूर

श्रीलंकेच्या ‘या’ गाण्याने घातली भारतीयांना भुरळ; सोशल मीडियावर रिल्सचा धुमाकूळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More