बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किती ती क्रूरता! गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर पोलिसाचा लाथ मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | कोरोनामध्ये सरकारी नियम आणि कायदा पाळणं खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच शासकीय आदेशांचे पालन करणे हे पोलीस प्रशासनाचंही कर्तव्य आहे. मात्र पोलीस काही ठिकाणी किती क्रूर पद्धतीने वागतात हे दिसून आलं आहे. पंजाबमधील फागवारायेथील शहरातील पोलीस ठाण्याच्या एचएचओ नवदीप सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एसएचओ नवदीप सिंग बुधवारी सराई रोडवरील भाजीपाला फेरीवाल्याजवळ गेले. तेथे त्यांना इतका राग आला की, त्यांनी संतापाच्या भरात भाजीच्या टोपलीला लाथ मारून उडवून दिली. हे पाहून तेथे उपस्थित लोक घाबरून पळून जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. डीजीपी पंजाब दिनकर गुप्ता यांनी नवदीप सिंग यांचं निलंबन केलं आहे.

कोणत्याही किंमतीत असं वर्तन सहन करणार नाहीत. यासाठी एसएचओ नवदीप सिंग यांना तातडीने प्रभागातून निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये इतर कोणीही सामील झाल्याचं आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं दिनकर गुप्ता यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवदीप सिंग अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चर्चेत असतात. फागवारा येथे नवदीप सिंह संबंधित पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर चोरी आणि इतर गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या असल्याची माहिती आहे. त्या घटना पोलीस सोडवू शकलेले नाहीत.

 

थोडक्यात बातम्या- 

#सकारात्मक_बातमी | दोन वेळा बायपास झालेल्या 74 वर्षीय पैलवानाची कोरोनावर यशस्वी मात

“पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका”

अखेरपर्यंत ICU बेड मिळालाच नाही; NSG ग्रूप कमांडरचा रस्त्यातच मृत्यू

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या आकडेवारी

आपल्या धन्याला वाचवण्यासाठी मॅरेथाॅन धावलेल्या लता करेंच्या पतीचा कोरोनाने मृत्यु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More