औरंगाबाद महाराष्ट्र

“….म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

औरंगाबाद | पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांनी भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या. धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या. वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही, असं विनायक मेटे म्हणालेत.

दरम्यान, खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेशा देण्यात शरद पवार बिझी असल्यामुळे त्यांना मराठा आरक्षणकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल असं म्हणत विनायक मेटे यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?”

मुंबईकरांनो मास्क घातला नसेल तर आता रस्ता झाडावा लागेल!

खडसेंनंतर ‘हा’ आमदार देणार भाजपला सोडचिठ्ठी!

महाराष्ट्रात कोरोनाची लस मोफत देणं गरजेचं- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या