महाराष्ट्र मुंबई

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं

मुंबई | प्रजासत्ताक दिनी आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्राराचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तेव्हा राज्यपालांनी राज्याला उद्देशून भाषण केलं. राज्यपालांचं हे भाषण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वाचून दाखवलं आहे.

राज्यात 13 टक्के परकीय गुंतवणूक आलेली आहे. देशात उद्योगासाठी चांगलं वातावरण तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे, असं विद्यासागर राव म्हणाले. 

कुपोषण निर्मूलनासाठी सरकारने विविध उपक्रम राबवले आणि कुपोषण रोखण्यात सरकारला यशही आलंय. ग्रामीण भागात 30 हजार किलोमीटरचे रस्ते बनवले, असंही राज्यपालांनी भाषणात सांगितलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण देऊन मराठा समाजाच्या प्रगतीचा प्रयत्न केला असल्याचंही राज्यपालांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायडूच्या पाठीवर आदळला, अन…, पाहा व्हीडिओ-

-प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसलं भुवया उंचावणारं चित्र

-“पतीच्या मृत्यूचे वृत्त ऐकून मी रडले नाही”

-काँग्रेस संपली असं समजू नका, अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादी, शेकापला इशारा

-चांगली खेळी करुनही ‘हिटमॅन’च्या पदरी निराशा, इतक्या धावांनी शतक हुकलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या