जे नाही पाहण्यात, तेच आलं विराट कोहलीच्या खाण्यात…

सिडनी | अनपेक्षित प्रकार घडल्यास आपण कशी प्रतिक्रिया देतो, तसाच काहीसा प्रकार भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत घडला आहे. अपेक्षाच नसल्यानं तो स्वतःच्या या कामगिरीवर अवाक् झाला. 

ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध भारताचा सराव सामना सुरु होता. भारताच्या पहिल्या डावातील 358 धावांना ऑस्ट्रेलिया एकादशने 544 धावा करुन उत्तर दिलं. 

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाजांना यश मिळत नसल्यानं विराटनं स्वतः चेंडू हातात घेतला, विराटचा हा निर्णय यशस्वी ठऱला कारण त्याने चक्क शतकवीर हॅरी नायलसनची विकेट घेतली. 

स्वतःच्या कामगिरीवर विराटला विश्वासच बसला नाही, त्यामुळे तो खेळपट्टीवरच अवाक् झालेला दिसला. 

 

महत्वाच्या बातम्या-

-“बुरे दिन जानेवाले है, राहुल गांधी आने वाले है”

-होय… विराट भारताला 2019 चा विश्वचषक जिंकून देऊ शकतो!!!

-मुंबईचा समुद्र पाहिला की लाज वाटते- नितीन गडकरी

-नरेंद्र मोदी कोणत्या प्रकारचे हिंदू? राहुल गांधींचा सवाल

-तुमचं दुःख माझं, तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढणार; तुम्ही पाहा आपणच जिंकणार!