बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट कोहलीचा जबरदस्त स्टंट; व्हिडीओ व्हायरल!

नवी दिल्ली | भारतीय कर्णधार विराट कोहली त्याच्या फिटनेस बाबत नेहमीच जागरुक असलेला दिसतो. त्याच्या या फिटनेसमुळं देशभरातील खेळाडू त्याच्याकडून प्रेरित होत असतात. यातच विराटनं इन्स्टाग्रामवर जिममधे वर्कआउट करतानाचा व्हिडियो शेअर केला आहे.

टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-0 आघाडी घेतली आहे. तिसरा सामना उद्या 29 जानेवारीला होणार आहे. या सामन्याआधी विराटने स्टंट करतानाचा एक व्हिडीयो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये त्याच्या समोर दोन बाॅक्स आहेत आणि विराट त्या बाॅक्सवर उडी मारताना दिसत आहे.

विराटच्या या व्हिडीओवर फॅन्सच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांच्या  पसंतीचा बनत आहे. हरभजन सिंगनं पण विराटच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

विराटची फिटनेस ही त्याच्या उत्तम कामगिरीचे एक उदाहरण आहे. त्यामुळं हा विराटच्या स्टंटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल होतोय.

 

 

View this post on Instagram

 

Putting in the work shouldn’t be a choice, it should be a requirement to get better. #keeppushingyourself

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

ट्रेंडिंग बातम्या – 

कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा; याचिका दाखल

तो व्हिडीओ पाहून रितेश हळहळला; नेटकऱ्यांकडे मागितला व्यक्तिचा फोन नंबर!

महत्वात्या बातम्या – 

महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभेसाठी प्रचार

…तर सरकार बरखास्त होऊ शकतं- सुधीर मुनगंटीवार

…म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More