Top News अहमदनगर बीड महाराष्ट्र

आई-वडील शेतकरी असल्यानं त्यांचं दुःख जवळून पाहिलं; लग्नानिमित्त घेतला स्तुत्य निर्णय

मुंबई | तो राज्याच्या विक्रीकर भवनात कर विभागात कार्यरत… तर ती पेशानं डॉक्टर… दोघांचं लग्न ठरलं. दोघेही शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची, आपल्या आई-बापाला कराव्या लागणाऱ्या कष्टाची जाण होती. याच जाणिवेतून त्यांनी आपल्या लग्नानिमित्त एक स्तुत्य निर्णय घेतला.

विठ्ठल नारायण बडे आणि डॉ. मिनल सानप अशी या दोघांची नावं... नव्या आयुष्याची सुरुवात सामाजिक कार्यानं करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. लग्नाचा खर्च कमी करुन तोच पैसा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ केला आहे. विठ्ठलनं आपलं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं आहे. भविष्यात कुठलेही अतिरिक्त वेतन न घेता राज्याची सेवा करण्यास कटिबद्ध असल्याचं विठ्ठलनं म्हटलंय.

डॉ. मीनलने कोविडच्या काळात पुणे येथे आरोग्यसेवा बजावली आहे. लग्नाच्या निमित्ताने तीनेही एक महिना विनामोबदला आरोग्यसेवा करण्याचा संकल्प केला आहे. आपल्या समाजामध्ये हुंड्याची प्रथा अजूनही अस्तित्वात आहे, यात सगळ्यात जास्त पिसला जातो तो शेतकरी बाप, त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कायमस्वरुपी मोफत उपचार करण्याचं आश्वासन तीनं दिलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्यासंदर्भात पत्र दोघांनी दिलं आहे, तसेच १० जानेवारी रोजी होणाऱ्या विवाहसोहळ्याचं निमंत्रणही दिलं आहे. विठ्ठल आणि डॉ. मीनल यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी ‘थोडक्यात’कडूनही मनःपूर्वक शुभेच्छा! 

थोडक्यात बातम्या-

येत्या 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घेणार

‘…तर युती तोडणार आणि स्वबळावर निवडणुका लढवणार’; भाजपला आणखी एका मित्रपक्षाचा इशारा

पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…

‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी

सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या