पुणे | हिवाळा संपत आला असून हळूहळू उन्हाची चाहूल जाणवू लागली आहे. मात्र तरीही अवकाळी पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. अशा अवकाळी पावसामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.
हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आता नागरिकही हैराण झाले आहेत. पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात हवामान खात्याकडून कोणताही इशारा दिला नाही.
राज्यात पावसाचा अंदाज नसला तरी उत्तर भारतात मात्र पावसासाठी पोषक हवामान तयार होताना दिसत आहे. देशातील अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशात बहुतांशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच तुरळक ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काल पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. उन्हाचे चटके सहन केल्यानंतर आज पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.
थोडक्यात बातम्या –
“कोण आहेत संजय राऊत? काल परवा शिवसेनेत येऊन कोणाला शिकवत आहेत”
‘कसौटी जिंदगी की’ फेम ‘हा’ अभिनेता वयाच्या 44 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात
पुरणपोळ्यांवरून राजकारण! रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला, म्हणाले…
महाराष्ट्राला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?, राजेश टोपे म्हणाले…
Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
Comments are closed.