बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता ! घाटी रूग्णालयात ICU मधील ‘या’ उपकरणाचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

औरंगाबाद | कोरोनानं राज्यात थैमान घातलं आहे. साधी सर्दी झाली, खोकला जाणवला की कोरोनाचा संशय व्यक्त केला जातो. तेव्हा कोरोना झाला की नाही, याचं निदान करण्यासाठी संशयित रुग्णाची स्वॅब टेस्ट केली जाते. अँटिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर तपासणीद्वारे संशयित पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, याचं निदान केलं जातं. मात्र, रूग्णालयातील जर एखाद्या उपकरणालाच कोरोना झाला तर? म्हणून औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात खबरदारी म्हणून घाटीतील वॉर्ड, आयसीयूतील 60 ठिकाणांहून उपकरणांचे नमुने गोळा करत कोरोना चाचणी करण्यात आली.

या तपासणीत एका मॉनिटरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मॉनिटरच्या सरफेसवर कोरोनाचा विषाणू आढळून आला. आता रुग्णालयातील वॉर्ड, आयसीयू आणि रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची कोरोना चाचणीद्वारे तपासणी केली जात आहे. रुग्णांना उपचारादरम्यान खोकला, शिंकेचा त्रास असतो. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना वॉर्डातील वेगवेगळ्या वैद्यकीय उपकरणांवर, फरशीवर कोरोनाचे विषाणू पसरण्याची भीती असते. यादृष्टीने रुग्णालयांत स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जातो.

यापूर्वी ऑपरेशन थिएटरचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत होतं. एखादा कोरोना रुग्ण आला तर ओटी बंद करून निर्जंतुकीरण, तपासणी केली जाते. आता अशीच खबरदारी अगदी  वॉर्ड, आयसीयूच्या बाबतीत घेतली आहे. घाटी रुग्णालयानं 60 ठिकाणचे नमुने घेत त्यांची कोरोना तपासणी केली. तेव्हा त्यात केवळ मॉनिटरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. व्हेंटिलेटर कोरोना निगेटिव्ह आल्याचही घाटी प्रशासनानं सांगितलं आहे.

दरम्यान, स्वच्छतेवर भर दिला जात आहे. यात आरटीपीसीआर तपासणीच करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच दिली जाईल, असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली आहे.

थोडक्यत बातम्या –

रूग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अमानुषपणे मारहाण, पाहा व्हायरल व्हिडीओ

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवर गुन्हा दाखल

रस्त्यावर थुंकणाऱ्यांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास द्यावा लागणार 1200 रुपये दंड

नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक

मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More