बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या वयातही आशाताई काय दिसतात ना’; राज ठाकरेंनी केली आशा भोसलेंची प्रशंसा

पुणे | शिवशाहीर आणि ज्येष्ठ इतिहासकार बाबाासाहेब पुरंदरे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. या शतक महोत्सवाच्या कार्यक्रमाला मनसे नेते राज ठाकरे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित होत्या. यावेळी राज ठाकरे यांनी भाषण केलं. भाषणामध्ये त्यांनी आशा भोसले यांच्या सौंदर्याची प्रशंसा केली.

कोण म्हणेल की आशाताई 88 वर्षाच्या वयात आहेत. या वयात असतानाही काय दिसतात ना! अशा प्रकारची चर्चा लोकांमध्ये होती. मला वाटलं की ते मी लोकांसमोर जाहीर सांगावं आणि ते मी सांगून टाकलं. तसेच त्या सुंदर आहेतच, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर ते स्वत:ही हसले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

बाबासाहेब, आशाताई इथे मंचावर बसलेले आहेत. आपण फक्त त्यांचे वयाचे आकडे मोजत बसायचे या पलीकडे आपण काहीच करायचं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी बाबासाहेब आणि आशाताईंचं कौतुक केलं. इतिहास लोकांना सहज समजेल, ते रूजेल अशा सोप्या पद्धतीने बाबासाहेब लोकांना इतिहास सांगत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, बाबासाहेबांनी शिवचरित्र अनेकांच्या घराघरात नाही तर अनेकांच्या मनात देखील पोहोचवलं आहे. बाबासाहेब तुम्ही असचं इतिहास सांगत राहा. तो इतिहास आमचे नातवंड, पतवंडं ऐकत राहतील, अशी इच्छा व्यक्त करत राज ठाकरेंनी बाबासाहेबांना वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या.

थोडक्यात बातम्या-

अनिल कपूरच्या घरी लगीनघाई; मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू

राहुल गांधींना ट्विटरकडून दिलासा; आठवड्याभरानंतर अकाऊंट अनलाॅक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप

‘शिवसेनेच्या दहशतीमुळेच…’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

कोरोना लसीचा बूस्टर डोस ठरणार ‘या’ रुग्णांसाठी फायदेशीर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More