बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेण्यासाठी दिवसातील योग्य वेळ कोणती?; तज्ज्ञांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली | कोरोनाचं (Corona) संकट काही संपायचं नाव घेईना. गेल्या दोन वर्षापासून या महामारीनं तर कहरच केला आहे. यातच कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट डोकं वर काढत आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. अशातच कोरोनाविषयी आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) करणं बंधनकारक केलं आहे. पण ही लस दिवसभरातून कधी घ्यायची, योग्य वेळ कोणती आहे, याविषयी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जर्नल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दावा केला आहे.

कोरोना लस घेण्याची योग्य वेळ ही दिपारी आहे. कारण दुपारी आपल्या शरिरात अॅंटीबाॅडीजची पातळी जास्त प्रमाणात असते. बायोलॉजिकल रिदम या जर्नलमध्ये याविषयी केलेल्या अभ्यासाविषयी माहिती दिली आहे.  24 तासांत शरीरात अनेक बदल होतात, ज्यात संसर्गजन्य रोग आणि लसीकरणाचा प्रतिसाद समाविष्ट असतो.

दरम्यान, डॉ. एलिझाबेथ बी. क्लेरमन म्हणतात, ‘आमच्या निरीक्षणात्मक अभ्यासात असे समोर आले आहे की, कोरेना लसीचा प्रभाव दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी बदलतो. हा अभ्यास लसीचा परिणाम ठरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

“ज्यांच्यावर छापेमारी झाली ते काय संन्यासी होते का?, कारवाई झाली ती योग्यच”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद”

“दलालांनो… मंगळसूत्र, शेती गहाण ठेवून दिलेले पैसे घेऊन तुमची मुलं सुखी होणार नाही”

Omicron | ‘….तर पुन्हा कडक निर्बंध लागू करू’; ‘या’ दहा राज्यांना केंद्राचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More