बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…या प्रकरणी BJP च्या सर्व ताई, माई अक्का तोंडाला कुलूप लावून बसल्या”

मुंबई | राज्यात महिलांवर होणाऱ्या आत्याचाराने महाराष्ट्राला हादरवलं आहे. अत्याचाराच्या घटनांवरुन विरोधी पक्षाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच 23 सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग झाल्याने खळबळ माजली. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सामनाच्या आग्रलेखातून संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. विकृतीचा कळस गाठणाऱ्या घटना देशभरात वाढत आहेत. त्यात महाराष्ट्रानेही सामील व्हावे याची खंत वाटते. 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत घडली. हे अत्याचार गेले आठ महिने सुरू होते. ही अशी प्रकरणे समोर येतात व राजकीय पक्ष बेबंदपणे अशा प्रकरणांचा गाजावाजा करुन आपापल्या राजकीय मतलबाच्या पोळ्या भाजतात तेव्हा त्या राजकारणाचीही किळस वाटते, अशी टीका त्यांनी केलीये.

साकीनाका ते डोंबिवलीपर्यंत अबलांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. पुन्हा मध्ये बोरिवली भाजप कार्यालय लागतेच. हे सर्व भयंकर प्रकार एक प्रकारच्या मानसिक विकृतीतून घडत आहेत. ही विकृती मोडून काढावीच लागेल. त्या राजकारणाचीही किळस वाटते सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे, मुंबईतील साकीनाक्यातील घटनेच्या जखमांचे व्रण ताजे असतानाच डोंबिवलीच्या घटनेने महाराष्ट्राचे समाजमन हादरलं, असं त्यांनी म्हटलंय.

बोरिवली प्रकरणातही भाजपच्या ताई-माई-अक्कांनी डोळे ओले करायला हरकत नव्हती, पण त्यांनी अश्रूंना बांध मोकळा करून दिला ते साकीनाका, डोंबिवलीप्रकरणी. हे धोरण दुटप्पी आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More