बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांशी फोनवर बोलताना आर्यनला अश्रू अनावर, ढसा-ढसा रडला

मुंबई | आर्यन खानच्या अटकेनंतर देशभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. एनसीबीनं आर्यनला अटक केलं असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच आज आर्यनला जामिन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्यनची चौकशी केली जात असताना आर्यन सतत रडत असल्याचं समोर येत आहे. आर्यनला जेव्हा दोन मिनिटांसाठी आपल्या वडिलांशी बोलण्याची परवानगी एनसीबीनं दिली तेव्हाही तो ढसा-ढसा रडला. शाहरुखशी फोनवर बोलताना तो सतत रडत होता. कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीनं आर्यनला त्यांच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटं बोलण्यास दिलं.

या ड्रग्ज प्रकरणी सध्या 12 जण अटकेत आहेत यापैकी 9 जण पुरुष आणि 3 मुलींचा समावेश आहे. आर्यनच्या केलेल्या चौकशीत त्यानं आपण चार वर्षापासून ड्रग्ज घेत असल्याचं कबूल केल्याचं समजतय. आर्यननं फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्येही ड्रग्जचं सेवन केल्याचं चौकशीतून समोर आलंय. याशिवाय त्याच्यासोबत त्याचा जवळचा मित्रही सोबत होता.

दरम्यान, आर्यन खानच्या अटकेनंतर त्याच्या वडिलांच्या म्हणजेच शाहरुख खानच्या अडणींमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आता अनेक कलाकार या प्रकरणात शाहरुखची साथ देत आहे. अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे. सध्या आपल्या मुलाच्या अटकेवर शाहरुख खान काय प्रतिक्रिया देईल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे शाहरुख याप्रकरणी काय प्रतिक्रिया देईल हे महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

पुण्याची पीएमटी देणार ओला-उबरला टक्कर, प्रवाशांसाठी ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आर्यनला चार वर्षापासून ड्रग्स घेण्याची सवय?, आता मन्नतची होणार झाडाझडती

“क्रुझवरच्या छोट्या माशातच एनसीबी व्यस्त, अदानीच्या बंदरावरील ड्रग्ज प्रकरणात मात्र…”

‘ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत’; प्रियांका गांधींसाठी राहुल गांधींचं ट्विट

शेतकऱ्यांनो सावधान! ‘कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक’; विमा कंपन्यांची आमदारांकडूनच पोलखोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More