ज्यांचा पहिलाच पुरस्कार मोदींना मिळाला ते फिलीप कोटलर नेमके आहेत तरी कोण?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला फिलिप कोटलर पुरस्कार देण्यात आला आहे. फिलिप कोटलर हे आधुनिक मार्केटिंगचे जनक म्हणून ओळखले जातात. ते अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात मार्केटिंग या विषयाचे प्राध्यापक होते.

जागतिक किर्तीचं पुस्तक म्हणून ओळख असणाऱ्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. त्यांनी 60 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन केलं आहे.

मार्केटिंग सोबत फिलिप कोटलर यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, शासकीय क्षेत्रातील मार्केटींग, नवनिर्मिती या विषयांवर देखील पुस्तकाचं लेखन केलं आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्याकडून देण्यात येणाऱ्या ‘लीडर इन मार्केटिंग थॉट’ या पुरस्कारासह 22 पुरस्कार फिलिप कोटलर यांना मिळाले आहेत.

दरम्यान, अ‌ॅमेझॉन या वेबसाईटवर फिलिप कोटलर यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग’ या पुस्तकाची किंमत 1,05,291 रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चंद्रावर १ एकर जागा विकत घेतलेल्या पुण्यातील महिलेची फसवणूक

-…म्हणून नरेंद्र मोदींना मिळाला पहिलाच फिलीप कोटलर पुरस्कार 

-श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार प्रिया प्रकाश वारियर, पाहा सिनेमाचा टीझर

-विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं निधन

-शिवाजीराव देशमुख नेमके कोण होते?… वाचा थोडक्यात-