मुंबई | भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनी मामा असा उल्लेख केला होता. याचदरम्यान आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईत पूनम महाजनांविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
प्रमोद महाजन यांच्या मृत्युचं प्रकरण उकरुन काढत राष्ट्रवादीने महाजन यांच्यावर टीका केली आहे. अहो चिऊ ताई…महाभारत यांचे कथानक राहू द्या देशातील जनतेला प्रवीणने प्रमोद ला का मारलं? याचं उत्तर पाहिजे, असं या पोस्टर मध्ये म्हणण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदी हे सूर्यासारखे तर शरद पवार हे शकूनी मामा सारखे आहेत, असं म्हणत पूनम महाजनांनी शरद पवारांवर टीका केली होती.
दरम्यान, राजकारणात ‘जशास तसे उत्तर’ देण्यात येते, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूनही पूनम महाजन यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं- नितीश कुमार
-पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध नव्या अराजकतेची ठिणगी- उद्धव ठाकरे
-“पूनमताई, प्रमोद महाजनांवर प्रविणने गोळ्या का झाडल्या हे सांगायला लावू नका”
… म्हणूनच भाजपचा हा सगळा डाव आहे- उद्धव ठाकरे
-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद; चार युवक जिल्हाध्यक्षांचे राजीनामे