बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात जो चमत्कार झाला तोच 2024 ला दिल्लीत होणार”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त सर्वस्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपली जोरदार भाषण केली आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या बहारदार भाषणानं या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली होती.

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वानं प्रभावित होऊन शिवसेना सोडून पवार यांच्यासोबत प्रदिर्घ राजकीय वाटचाल केली आहे. परिणमी भुजबळ यांना पवार यांच्या राजकारणाची चांगली जाण आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. महाराष्ट्रात जो चमत्कार झाला तोच 2024 मध्ये दिल्लीत होणार, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांच्या माध्यमातून सध्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. छगन भुजबळ यांनी पवार यांच्याबद्दल अनेक अंगानी भाषण केलं. त्यांनी पवार यांच्याबद्दल बोलताना एका शायरीचा आधार घेतला होता.  पवार साहेबांबद्दल एकच गोष्ट बोलेन की, “ना समझो की ना आता मुझे जिने का सलिका, मैं पैरोंतले जमीन और मुठ्ठी में आसमान रखता हूँ!”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी देशातील मातब्बर नेत्यांसोबत काम केलं आहे. सहकार, साखर, कृषी, क्रिडा, महिला, राजकारण, समाजकारण, उद्योग या सर्व विषयांवर पवार यांची पकड अत्यंत मजबूत आहे. परिणामी पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षांतील नेते सुद्धा पवार यांचं गुणगान गातात.

थोडक्यात बातम्या 

“शरद पवार म्हणजे पाॅवर हाऊस नेते, त्यांचा नेम अचुक असतो”

“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

“बॅचलर राहु नका, घरात बायको असली की माणसाचं डोक शांत राहतं”

“कितीही तुटून पडा, कितीही कडवट बोला पण शरद पवारांचा संयम कधी सुटणार नाही”

“पवार साहेबांनीच शेतकऱ्यांना हमीभाव दुप्पट चौपट करून दिला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More