Top News

पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!

Photo Credit - Facebook / @AjitPawarSpeaks

पुणे |  महाराष्ट्रात एकामागोमाग एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तुपे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे रविवारी चेतन तुपे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीला देखील उपस्थितीत होते.

चेतन तुपे यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून तब्येत चांगली असल्याचं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहनही तुपे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकामागोमाग एक कोरोना बाधित होत असल्यानं खळबळ उडाली आहे. याआधी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, एक मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येत आहेत. राज्यभर फिरणाऱ्या मंत्र्यांना आठ दिवसांमध्ये झालेला हा कोरोना खरा आहे की, हा राजकीय कोरोना आहे?, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. अधिवेशनात भाजपच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे. WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, अशी उपरोधिक टीका राणेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केली खंत

‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या