बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मालकाच्या शवासमोर हात्ती आला अन्…; पाहा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

तिरूअनंतपुरम | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही पशु-पक्षांचे व्हिडीओ व्हायरल असतात. तर कधी त्यामध्ये प्राण्यांचेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही खूपच धक्कादायक, विश्वास न बसणारे असतात. आपल्या माहित असेल की, काही लोकांना त्यांच्या घरात एखादा प्राणी किंवा पक्षी पाळायला फार आवडते.

काहीजण तर असं म्हणतात की, आपण जेवढा जीव माणसांना लावतो. तो लावण्यापेक्षा तोच जर आपण एखाद्या प्राण्याला लावाला, तर तेही आपल्याला तितकाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त जीव लावतात. या आधी आपण काही चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की, एखाद्या प्राण्याचा, पक्ष्याचा घरमालकाचा मृत्यू होतो. त्यावेळी तो पाळीव प्राणी त्यांच्या शवाजवळ बसून रडत असतो. हे आपण आतापर्यंत चित्रपटांमध्येच पाहिलं आहे. परंतू आश्चर्याची बाब म्हणजे याच सारखी एक घटना केरळमधील कोट्टायममध्ये घडली आहे.

‘कुण्णक्कड दामोदरन नायर’ या व्यक्तीचा कॅन्सरशी लढताना मृत्यू झाला. जितकं दु:ख त्यांच्या कुटुंबियांना झालं आहे. तेवढचं दु:ख त्यांनी पाळलेल्या हात्तीलाही झालं आहे. हात्ती कुण्णक्कड यांच्या शवाजवळ येऊन त्याने त्याला झालेलं दु:ख व्यक्त केलं आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये कुण्णक्कड यांचं शव घराजवळ ठेवलं आहे. त्यावेळी त्यांच्या घरातील सगळी मंडळी रडत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाळलेला हात्ती येतो. हात्ती त्या शवाजवळ जाऊन आपल्या सोंडेने त्यांना शेवटचा निरोप देत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. तसेच हात्तीचं आपल्या मालकाप्रती प्रेम पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पाच मुलांच्या आईने प्रियकराला सोबत घेऊन केली स्वत:च्याच पतीची हत्या

….म्हणून तरूणाने पोलिसांना फोन करत दिली थेट पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी

बाबो! पिंपळाला लागलाय आंबा?, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर समोर आलं खरं कारण

काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली- विनायक मेटे

लाखो रुपये नव्हे फक्त 10 रुपयात ‘हे’ डॅाक्टर दाम्पत्य करतंय कोरोनावर उपचार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More