बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरले, आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची चीनला जाणीव”

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात भारतीय जवानांशी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीनला एक धडा मिळाला. आपले सैनिक हे पुरेसे सक्षम नाहीत, त्यांना आणखी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, या गोष्टीची चीनला उपरती झाली, असं CDS बिपीन रावत यांनी म्हटलंय.

गेल्यावर्षी मे आणि जून महिन्यात लडाख परिसरात भारतीय आणि चिनी सैनिक अनेकदा आमनेसामने आले. तेव्हा चीनला आपल्या मर्यादांची जाणीव झाली. आपल्या सैनिकांना अधिक तयारीची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, असं रावत यांनी म्हटलं.

चिनी सैनिकांना फार थोड्या कालावधीसाठी लडाखच्या प्रदेशात तैनात केलं जातं. तसेच हिमालयासारख्या पर्वतरागांमध्ये लढाई कशी करायची याचा त्यांना फारसा अनुभव नाही. गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांशी झालेल्या झटापटीवेळी ही बाब उघड झाली. तेव्हापासून लडाख प्रदेशातील चिनी लष्कराच्या सैन्य तैनातीमध्ये अनेक बदल दिसून आल्याचं CDS बिपीन रावत यांनी सांगितलं.

लडाखसारख्या पर्वतीय भागात लढण्याचा त्यांचा अनुभव अत्यंत कमी आहे. याउलट भारतीय सैनिक हे अशा परिस्थितीत लढण्यासाठी अधिक सक्षम आणि युद्धकौशल्यात निपूण आहेत. चिनी सैनिकांच्याबाबतीत हे चित्र पूर्णपणे उलटं आहे, असं बिपीन रावत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोदींचा आणखी एक मोठा निर्णय, ‘या’ सरकारी बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला सुरुवात!

कोविशील्ड लस घेतलेल्या 11 जणांना झाला हा दुर्मिळ आजार; तज्ज्ञांचा दावा

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More