Top News नाशिक महाराष्ट्र

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

नाशिक  | विधान परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर आताबृहन्मुंबई महापालिका निवडणुकीवर कोण आपला झेंडा फडकवणार?, याची चर्चा सगळीकडे आहे. अशातच भाजप आणि मनसेने एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जाऊद्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. सध्याच्या स्थितीत काहीही बदल होणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले. नाशिकमध्ये राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपने मनसेसोबत जाण्याची चर्चेबद्दल पत्रकारांनी राऊतांना प्रश्न केला. त्यावर राऊत म्हणाले, ‘हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात हे बघाव लागेल’.

दरम्यान, प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढल्यास चांगले निकाल लागतील. त्यासाठी आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. मुंबईत आम्ही पहिल्या नंबरचा पक्ष आहे. नाशिकमध्ये दुसऱ्या मात्र आघाडीच्या अनुषंगाने विचार केलात तर पहिल्या, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘देवेंद्र.. जीवनात मोठं व्हायचं असेल तर…’; फडणवीसांनी सांगितला मुंडेंनी दिलेला कानमंत्

शेतकऱ्यांनो कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

धक्कादायक!; पुण्यातील भाजप आमदाराच्या घरात मोठी चोरी, इतक्या लाखाचे दागिने लंपास

पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…; भाजपचा शिवसेनेला टोला

महासागराप्रमाणे खोली अन्…!म्हणत रोहित पवारांनी आजोबांना दिल्या खास शुभेच्छा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या