पुणे महाराष्ट्र

आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते, ते…. – अजित पवार

पुणे | गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. त्यामुळेच त्यांचे सर्व पक्षात संबंध असल्यानेच ते आमदार, खासदार म्हणून निवडून येतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांना लगावला आहे.

संवाद पुणे आयोजित ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमाच्या समारोपात अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी गिरीश बापट यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या.

आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते. ते ताजी-ताजी गोष्ट लक्षात ठेवतात, मात्र नंतर त्याचे परिणाम दिसतात, असंही अजित पवार म्हणाले.

प्रबोधनकार यांनी ठाकरे शैली निर्माण केली. निर्भीड, परखडपणे बोलण्यासाठी ठाकरे शैली समोर आली. गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. गिरीश बापट भाजपचे खासदार नाही, तर पुणेकरांचे खासदार आहेत. सर्व पक्षात त्यांचे संबंध म्हणून ते आमदार, खासदार म्हणून निवडणूक येतात , असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून सीमांवर परत यावं- अमरिंदर सिंग

“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”

‘आता मला लाज वाटायला लागली आहे’; प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला

“आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?”

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या