बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का?”

मुंबई | बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणी एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रुझवर एनसीबीने छापा टाकत आर्यनसह 11 जणांना अटक केली आहे. त्यामुळे या घटनेवरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुुंबईत क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाच्या दलाने केलं आहे. मात्र मुंबईत अशा पदार्थाची सर्रास तस्करी आणि वापर होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले होते की काय?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन आणि तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र गृहविभाग हॉटेल आणि बार मालकांकडून वसूली करण्यात धन्यता मानत आहे, असंही भातखळकर म्हणाले,

दरम्यान, एनसीबीच्या चौकशीत आर्यननं गेल्या 4 वर्षापासून ड्रग्स घेतल्याची कबूली दिली आहे.  त्याचबरोबर आर्यनचा मित्र अरबाज मर्चेंटही ड्रग्स घेत असल्याची माहिती समोर येत आहे. जर अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाला तर कलम 20 बी, 8 सी, 27 आणि 35 नूसार आर्यनला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते.

थोडक्यात बातम्या-

बाबो! ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला आहे ‘हा’ गंभीर त्वचा रोग!

‘तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर असतो…’; आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More