बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

मुंबई | राज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर आहे. तर दुसरीकडे राज्यात लसीच्या तुटवड्यामुळे काही लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. याच कारणावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने नागपुरात लस घेतली होती. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे.

45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना देखील फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का?, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

तन्मय फडणवीस हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे. सध्या त्याचे वय 25 वर्षांहून अधिक नाही. सध्या फक्त 45 वयाच्या वरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे त्याने लस घेतल्याचा फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्री इन्स्टाग्रामवरून तो फोटो हटवण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवले होते. त्यानंतर या फोटोवरून फडणवीस यांना चांगलच ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती समोर येत आहे. याआधी देखील त्यांने पहिला डोस घेतला होता. 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, असा सवाल आता सामान्य लोक करत आहेत.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

चेन्नईचा राजस्थानवर सुपर विजय, गुणतालिकेत घेतली भरारी

…म्हणून या सीझनला आत्तापर्यंत हार्दिक गोलंदाजी करताना दिसला नाही’; मुंबईच्या गोटातून महत्त्वाची माहिती

पुण्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी व्हायला सुरुवात, पाहा आजची आकडेवारी

‘देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मंत्री लेडीज बारमध्ये जातात’; संजय गायकवाडांचा पलटवार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More