बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आढळतात कोरोनाची ‘ही’ लक्षणं

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असं वाटत असतानाच अनेक राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने सर्वांचंच टेंशन वाढवलं आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून संपूर्ण लसीकरणावर भर देण्यात आला. ओमिक्रॉन ब्रेकआउट दरम्यान संपूर्ण लसीकरण होऊनही कोरोनाची लागण झालेल्या लोकांची चाचणी करण्यात आली होती. यावेळी लसीकरण होऊनही कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये 8 प्रमुख लक्षणे आढळून आली आहेत.

थकवा, चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे ही दोन मुख्य लक्षणे संपूर्ण लसीकरण होऊनही कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसून येतात, अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. तर तज्ज्ञांच्या मते यातील चक्कर येणं हे लक्षण ओमिक्रॉन असू शकतं.

दरम्यान, खोकला, वाहती सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा, ताप, शिंका, स्नायू दुखणे अशी कोरोनाची आठ लक्षणं देखील लसीकरण झालेल्या लोकांमध्ये आढळून येतात. देशातील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी व कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा धोका बघता सरकारकडून सतर्कता बाळगली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले…

राष्ट्रवादीचे आमदार उदयनराजेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

’14 तारखेला अनेकांचे मास्क उतरवणार’; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

“आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे”

मोठी बातमी ! टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण आग, अनेकजण जखमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More