बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

अमरावती | राष्ट्रवादीचे कर्ताधर्ता शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून प्रचंड टिका करण्यात येत आहे. भाजपचे आमदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही पवार यांना पत्र लिहून जोरदार टीका केली आहे.

अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र बोंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. तसेच या पत्रातून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि बारा बलुतेदारांच्या समस्यांकडे पवारांचं लक्ष वेधून या वर्गासाठीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा आग्रह धरला आहे.

पवार साहेब, मुख्यमंत्री फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीनं पत्र लिहिलं. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशिर्वादावरच तुमची मदार असेल. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत. शेतमजूरसुद्धा सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दु:खितांच्या, पिडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा ना, असा चिमटा बोंडे यांनी या पत्रातून काढला आहे.

दरम्यान,  विधानसभेत दिलेली वीज कापण्याची स्थगिती ऊर्जा मंत्र्यांनी उठवली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला.  त्यामुळे कोरोना काळातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा. महाराष्ट्रातील शेतकरी या वर्षी संकटात आहेत. कोरोनामुळं कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी 

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास MPSC ची तयारी

सोशल मीडियावर मुलगा बनून तरुणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, सेक्स टाॅयने ठेवले शारीरिक संबंध

आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आजीने उघडले डोळे अन्…

कोरोनानंतर होणारा ‘म्युकरमायकोसिस’ आजार नेमका आहे तरी काय? वाचा संपुर्ण माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More