महाराष्ट्र सिंधुदुर्ग

“सिंधुदुर्गधील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा”

सिंधुदुर्ग | कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान कार्यालयात बोलावलं होतं. पण आपण भाजपमध्ये गेलो नसल्याचं सांगत मोठा गौप्यस्फोट शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते नारायण राणेंवर नाव न घेता निशाणा साधला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरही केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं. ते आज मुख्यमंत्र्यांवर आणि बाळासाहेंबांवर टीका करत असल्याचं केसरकर म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची त्यांची पात्रता आहे का?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी याकडे लक्ष देऊ नये, असंही केसरकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून भाजप आमदाराने आमिर खानविरोधात केला गुन्हा दाखल

“मी सगळा खुलासा केला तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड जाईल”

“मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही”

मंदिरं खुली करण्यापासून शिवसेना दूर का जातेय?; प्रवीण दरेकर यांचा सवाल

‘भाजपची लाट असताना मला पंतप्रधान कार्यालयात बोलावून ऑफर दिली होती’; मंत्रिपद हुकलेल्या शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या