Top News महाराष्ट्र मुंबई

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

पुणे | राज्यातील दोन मातब्बर नेते उपमुख्यमंंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज एकात मंचावर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एकत्र आले. त्यामुळे त्याठिकाणी टोलेबाजी पाहायला मिळणार हे सर्वांनाच माहित होतं. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणावेळी हास्याचे कारंजे उडवले.

भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी हा प्रकल्प पुणेकरांच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे हे सांगताना फडणवीस म्हणाले,जर दोन-तीन दिवसांच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला तुमच्या घरी बोलवा किंवा तुम्ही माझ्या घरी चहाला या. असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून शाब्दिक फटकेबाजी तर केलीच त्यासोबतच त्यांनी काही हास्याचे कारंडेदेखील उडवले.

दरम्यान, हरात इ-बसेस वाढवण्यात येत आहे. मेट्रो चे गतीने काम सुरू आहेत. अजित पवार त्याला गती देत आहेत. सर्वच जण एकत्र येऊन काम केल्यास पुणे जागतिक स्तरावरची सिटी होईल, असंही फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

लता मंगेशकर यांचं ठाकरे कुटुंबाला उद्देशून ट्विट; ट्विटमध्ये म्हणतात…

सोनमची कपूरची बातच न्यारी! हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

#Video | धारावीत घरात शिरलेल्या अजगराला पोलिसानं स्वत:च्या हातानं धरुन बाहेर काढलं

“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”

‘एकच वादा अजितदादा’ vs ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या