Top News पुणे महाराष्ट्र

एक दिवस ही ‘ईडी’च भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

पुणे | ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या मानेवर ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यांपर्यंत जायचं. कुठेही ‘ईडी’चा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसांपासून भाजपचं चाललंय. ही ईडी’च त्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे भाजपवर केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, शेतकऱ्यांच्यासंबंधी केंद्रांने जो कृषी कायदा केला आहे तो कायदा शेतकऱ्यांना पूर्णपणे संपवणार आहे. उद्या जर शेतकरी संपला तर हा कृषीप्रधान असलेला देश संपणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबत”

…म्हणून क्रिकेटपटू मनदीप सिंह शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाला सहभागी

दुचाकीवरुन प्रवास करणारांसाठी आता नवे नियम; पाळले नाहीतर कारवाई होणार!

“मोदी सरकारमधील नेत्यांना 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या