मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मागील काही दिवसांपासून ईडीच्या निशाण्यावर आहेत. देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख इडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. मात्र आता अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
गेल्या काहि महिन्यांपासून गायब असलेले अनिल देशमुख आज सकाळीच इडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टापर्यंत दिलासा न मिळाल्याने आज अखेर ते ईडीसमोर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता ईडीकडून अनिल देशमुखांची कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे आता ईडीकडून अनिल देशमुखांची फक्त चौकशी होणार की अनिल देशमुखांना अटक केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.पण अद्याप देशमुख यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत. दरम्यान आज सकाळीच अनिल देशमुख ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकिल इंद्रपाल सिंह देखील होते.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात झाली असून देशमुखांची चौकशी बराच वेळ चालणार अशी शक्यता आहे. मात्र विरोधकांच्या अनेक आरोप प्रत्यारोपानंतर अनिल देशमुख अखेर ईडीच्या चौकशीला हजर राहीले आहेत. त्यामुळे आता चौकशीनंतर नेमकं काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“त्यांना समीर वानखेडेंची एवढी आपुलकी का वाटतीये?”
“दाउदसोबत संबंध असलेला मंत्री मोदींच्या मंत्रिमडंळात कसा?”
अमृता फडणवीसांसोबत फोटोत दिसणारी ‘ती’ व्यक्ती ड्रग्ज पेडलर; नवाब मलिकांच्या दाव्याने खळबळ
विकत आणलेल्या पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची? वाचा सविस्तर
देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी
Comments are closed.