बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये याला काय म्हणावं?”

जळगाव | जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पुढच्या महिन्यात पार पडणार आहे. पण या निवडणुकीच्या आधीच यावरून वेगवेगळे मुद्दे रंगत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. पण यात भाजप खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली.

रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यातच भाजप खासदाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याचा हा मुद्दा उचलून धरत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसेंना चांगलाच टोला लगावला आहे. एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये, याला काय म्हणावं?, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज छाननीला सुरूवात झाली. यात रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जात अनेक त्रृटी असल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. रक्षा खडसेंचा अर्ज रद्द झाल्याने जळगाव जिल्हा बँकेत रक्षा खडसे विरूद्ध रोहिणी खडसे लढत आता पाहायला मिळणार नाहीये. रोहिणी खडसेंच्या विरोधात आता प्रमुख प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांच्या विजयाची वाट मोकळी झालेली दिसत आहे.

गुलाबराव पाटील यांनी ही निवडणूक सर्वपक्षीय पद्धतीने लढवता यावी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपसोबत निवडणूक लढवायला नकार दिल्याने आता भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे. निवडणूक होण्यापुर्वीच स्थानिक राजकारणात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

झोमॅटो आणि पाकिस्तानी फुड डिलिव्हरी ॲपमध्ये ‘या’ कारणावरून रंगलंय शीतयुद्ध

संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…

पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयाची परंपरा अखेर मोडीत काढली

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More