बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुजरातमध्ये जप्त झालेल्या हेरॉइनबद्दल नरेंद्र मोदी, शहा यांचं मौन का?”

नवी दिल्ली | गुजरातच्या गांधीनगर येथील मुंद्रा पोर्टवरून तब्बल 20 हजार कोटींचं हेराॅईन जप्त करण्यात आलं आहे. मात्र या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी मौन का बाळगलं आहे?, असा सवाल विरोधकांनी  केला आहे.

मुद्रा बंदर अदानी समुहाकडे असल्याने मोदी आणि शहांनी मौन धारण केलं आहे का?, असे आणखी 11 प्रश्न विरोधकांनी विचारले आहेत. यावेळी अफगाणिस्तानमधून गुजरातला हेरॉईन पोहोचले कसे? अमली पदार्थ विभाग आणि गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? कारण हे ड्रग सामान्य तपासणीत पकडले गेले. विभागाला त्याची काहीही पूर्वकल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग पकडले गेले त्यामुळे ड्रगची तस्करी करणाऱ्यांनी गुजरातमधील त्याच बंदराला का निवडले जो अदानी यांचा आहे?, असं ट्विट काँग्रेसने केलंय.

मुंद्रा पोर्टचा ताबा हा प्रसिद्ध अदानी समुहाकडं आहे. मुंद्रा पोर्टवर 20 हजार कोटी किंमतीचे 2988 किलो हेराॅईन सापडल्यानं अदानी समूह पुन्हा चर्चेत आलं आहे. अदानी सुमहाकडे या पोर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे देशभरातून गौतम अदानी यांना लक्ष्य केलं जात आहे.

दरम्यान,  या तस्करीशी कोणताही संबंध नाही, सोशल मीडियावर नाहक बदनामी केली जात आहे, असं स्पष्टीकरण अदानी ग्रुपच्या अधिकृत ट्विटर अकाऊण्टवरुन रात्री उशिरा परिपत्रक जारी करत देण्यात आलं आहे. मात्र मोदींच्या गुजरातमध्ये असा धक्कादायक प्रकार झाल्याने आता सर्वांच्या नजरा मोदींच्या प्रतिक्रियाकडे लागल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘ही’ एक चूक संजू सॅमसनला पडली महागात; भरावा लागणार ‘इतक्या’ लाखांचा दंड

खळबळजनक! अदानींच्या ताब्यात असलेल्या गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त

कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच- देवेंद्र फडणवीस

‘…अन् महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला’; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

“…त्यामुळे आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More