महाराष्ट्र मुंबई

“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”

मुंबई | काही वर्षांपूर्वी मोदी आणि अमित शहा नेपाळमार्गे युरोपला पळतील, असं गणेश नाईक म्हणायचे. पण हेच तिकडे पळाले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईकांना लगावला आहे.

भाजपने सर्वांना धंद्याला लावले आहे. त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडले नाही, अशी टीका आव्हाडांनी केलीये. ते नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे. मग आपले शेतकरी कुठे जातील? ज्या सहकार चळवळीने महाराष्ट्राला मोठे केलं त्याच सहकार क्षेत्रात भाजपने घोळ घातल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

शरद पवार यांचा गणेश नाईक यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण नाईक यांनी त्यांना धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी अशाचप्रकारे विश्वासघात केला होता, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

थोडक्यात बातम्या-

‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे ‘या’ दिवशी दिसणार एकाच मंचावर!

‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”

‘पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा’; माजी सनदी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या