मनोरंजन

लग्नाआधी प्रेग्नंट असलेल्या कल्कीने नेटकऱ्यांना दिलं सडतोड उत्तर!

मुंबई | अभिनेत्री कल्की कोचलीन लग्नाआधिच प्रेग्नंट असल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. यालाच कल्की कोचलीनने सडेतोड उत्तर दिलं आहे.

कल्की पहिल्यांदाच आई होणार आहे. मात्र बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गशी लग्न करण्यापूर्वीच आई होणार असल्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याची खंत कल्कीने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.

आपल्या देशात लग्नाआधी आई होणाऱ्या स्त्रीबद्दल लोक त्यांची मतं बनवतात. तुझा नवरा कुठे आहे? तु असं कसं करू शकतेस? असं प्रश्न विचारत मला ट्रोल करण्यात आलं, असं कल्कीने म्हटलंय.

दरम्यान, मी माझ्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होऊ देत नाही. प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, असं कल्कीने म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या