महाराष्ट्र मुंबई

“तुमच्या सोबत बसणारा मंत्री 11 दिवस झाले गायब आहे, त्याला तरी शोधा”

Photo Credit- Facebook/ Udhhav Thackarey, Sanjay Rathod

मुंबई | मूळची परळीची असलेल्या पूजा चव्हाणने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. याच मुद्दयावरून विरोधकांनी आक्रमक भुमिका घेत सरकारला धारेवर धरलं आहे.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो, रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पहातोय पण थेट मंत्रीच 11 दिवस गायब. ना आता ना पता!, महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं पण आता मंत्री महोदय 11 दिवस गायब आहेत आणि कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते?, असं ट्विट करत केशव उपाध्ये यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

पूजा अरुण राठोड नावाने एका तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळचा हा रिपोर्ट आहे. त्यामुळे ही पूजा अरुण राठोड कोण?, पूजा अरुण राठोड हिचा पूजा चव्हाणशी काय संबंध?, पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? कथित मंत्र्याने आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात हा गर्भपात घडवून आणलाय का?, अशा अनेक प्रकारचे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात फार काही कारवाई होईल, असं वाटत नाही. नो वन किल्ड जेसिका या सिनेमासारखी या प्रकरणाची परीस्थिती होईल. हे सगळं ठाकरे सरकारच्या आशिर्वादाने सुरु आहे. हे प्रकरण दाबण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या-

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता; पाहा काय आहे प्रकरण

आरोग्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, राजेश टोपे म्हणाले…

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ

राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या