Top News खेळ

2019 वर्ल्डकपच्या शेवटी ताण कमी करण्यासाठी बेन स्टोक्सने केलं असं काही…..

मुंबई | इंग्लंडने वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावून एक वर्ष उलटलंय. इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने हातातून निसटत चाललेला सामना बरोबरीत सोडवला. अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू चांगलेच तणावाखाली होते. स्टोक्सने सुपरओव्हर ब्रेकमध्ये खूप सिगरेट पिल्याचं कळतंय.

हा गौप्यस्फोट ‘Morgan’s Men: The Inside Story of England’s Rise from Cricket World Cup Humiliation to Glory’ या पुस्तकात केला आहे. या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे “मैदानात २७ हजारांच्या घरात प्रेक्षक, टीव्ही कॅमेरे आणि सुपरओव्हरमुळे फार उत्सुकता निर्माण झालेली होती. या सर्व परिस्थितीत लॉर्ड्स मैदानावर एकांत मिळेल अशी जागा मिळणं खूप कठीण होतं. पण बेन स्टोक्स या मैदानावर अनेकदा खेळला होता. या मैदानातला प्रत्येक कोपरा त्याला माहिती होता. कर्णधार इयन मॉर्गन आपल्या संघाला शांत करुन नवीन रणनिती आखण्यात होता.

संघाची रणतिनी आखत असताना असताना स्टोक्सने संघापासून वेगळं राहणं पसंत केलं. तो पूर्णपणे घामाने भिजला होता. २ तास २७ मिनीटं फलंदाजी करत अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेल्यानंतर तणाव येणं साहजिक होतं. अशावेळी स्टोक्सने काय केलं असेल?? त्याने संघाच्या ड्रेसिंग रुममागे जाऊन, वॉशरुममध्ये जात सिगारेट ओढली आणि स्वतःला शांत केलं, निक हौल्ट आणि स्टिव्ह जेम्स यांनी आपल्या पुस्तकात या प्रसंगाबद्दल लिहिलंय.

2019 वर्ल्डकपचा अंतिम सामना फार रंगतदार ठरला होता. हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपओव्हरही बरोबरीत सुटल्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेते म्हणून घोषित करण्यात आलं. ज्यावरुन नंतर वादही झाला तसंच सोशल मिडीयावर न्यूझीलंडवर अन्याय झाल्याचंही बोललं गेलं. त्यामुळे आयसीसीने चौकारांच्या निकषाचा निर्णय रद्द केला.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या