बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | मागील काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 313 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 511 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 4 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,51,494 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4650 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,188 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,28,138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानविरूद्ध भारताला यश का मिळतं?, विरेंद्र सेहवाग म्हणतो…

विराटसेनेची चिंता वाढली! पाकिस्तानच्या ‘या’ दोन खेळाडूंनी सामन्याआधी दाखवला ट्रेलर

“आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं स्वागत काळे झेंडे दाखवून करा”

उस उत्पादक आणि सहकाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय – देवेंद्र फडणवीस

”त्या’ बिहारी लोकांना मोफत AK-47 द्या’; भाजप आमदाराची अजब मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More