बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…”

पुणे | महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याचा गंभीर आरोप केला.

पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत. ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत. आपण म्हणतो काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं, पण आपल्या संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते तेच ठरवतात. कारण त्यासाठी त्यांचीच सही लागते. कुठल्याही समित्यांवर नावं पाठवायची असतील तर त्याला संपर्कमंत्र्यांची सही चालत नाही. त्यासाठी पालकमंत्र्यांचीच सही लागते. हा त्रासालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद बनवावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. ते लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

स्वबळाबाबत मी जे बोललो त्यात मी माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे, काही नाही, असं नाना पटोले म्हणाले.

ज्या लोकांना समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाही. त्या रागालाच आपण आपली ताकद बनवली पाहिजे, असं नाना पटोलेंनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“राहुल गांधी जिंदाबाद घोषणा दिल्यावर माणसाचं सोडा बैलालाही ते सहन झाले नसावं”

‘गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार’; बैलगाडीवरुन कोसळलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रसाद लाड यांचा खोचक टोला

“काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही”

सकारात्मक बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज आढळले फक्त 2 कोरोनाबाधित रुग्ण

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More