बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

नवी दिल्ली | ‘हम तो फकीर आदमी है, झोला उठाके चल पढे’ असं अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलताना आपण ऐकलं आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींची संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निव्वळ संपत्ती ही 3.7 कोटी रूपये आहे. गेल्या वर्षी ही मोदींची संपत्ती ही 2.85 कोटी इतकी होती. त्यानंतर नुकतीच त्यांच्या संपत्तीत 22 लाखांची वाढ झाली असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

नरेंद्र मोदींनी शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक केली नाही. 31 मार्च रोजी भारतीय स्टेट बँकेत मोदींची 1.86 कोटींची ठेवी होती. तर मागील वर्षी ही रक्कम 1.6 कोटी होती. तर 2014 पासून मोदींनी एकही नवीन मालमत्ता खरेदी केली नाही. हिंदूस्तान टाईम्स या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान,2018 साली नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 2.28 कोटी रुपयांची मालमत्ता होती. पंतप्रधान कार्यलयाने याची माहिती दिली होती. तर मोदींनी विमा पाॅलिसी आणि बाँडमध्ये देखील काही गुंतवणूक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मोदी म्हणत असतील, बघ तुझी कशी जिरवली आता घाल…’; अजित पवारांची टोलेबाजी

“बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात अशी यांची मानसिकता”

‘लोकांना वाटलं मी लय सिरीयस आहे, आपलं शेवटचं मत टाकावं’; दानवेंनी सांगितला मजेशीर किस्सा

“लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारला”

‘…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक?’; ठाकरे सरकारला घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More