महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र असाच चालवला तर लोक चपलेने आभार मानतील तुमचे- निलेश राणे

मुंबई |  भाजप नेते निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी वाया जाऊ देत नाहीयेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीकेचे बाण सोडत असतात. बुधवारी रात्री एका वृत्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांवर जहाल टीका केली आहे.

महाराष्ट्र असाच चालवला तर लोक लवकरच चपलेने आभार मानतील तुमचे, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली आहे. मुख्यमंत्री कोरोनाविरोधी लढ्यात जी काही पावलं उचलत आहेत त्यावर निलेश राणे नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिक सक्षमपणे आणि जबाबदारीने पावलं उचलावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचं जे लोक कौतुक करत आहेत ती PR टीम असून आपण या काळात आपण खूप मेहनत घेत आहात, असा टोला त्यांनी कौतुक करणाऱ्यांना लगावला आहे. तर त्याअगोदर ट्विट करून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हे ठाकरे सरकार नव्हे तर हे ठेकेदार सरकार असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत अशा लोकांचं तीन महिन्यांचं भाडं सरकारने या संकटाच्या काळात भरलं पाहिजे, अशी मागणी केली होती. घरमालकांनी भाडेकरूंकडे भाड्यासाठी तगादा लावू नये, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या. तसंच तीन महिन्यांनंतर भाडे वसूल करावं, असंही सरकारने म्हटलं होतं. यावरच बोलताना त्यांनी वरील मागणी केली होती.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

…तर चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचं कशाला?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल

या दिवशी पंतप्रधान मोदी पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; लॉकडाऊन तसंच ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या