विदेश

पाकिस्तानात दहावी फेल उडवताहेत सरकारी विमानं!

लाहोर |  पाकिस्तानमध्ये दहावी नापास असलेले पायलट, सरकारी विमानं उडवत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलायन्सच्या 5 वैमानिकांना या संबंधी अटक करण्यात आलं आहे.

या वैमानिकांनी खोटे प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचं पुढं आलं आहे. डॉन या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. एकूणचं हा सगळा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.

जिथे दहावी नापास व्यक्ती बस चालवू शकत नाही तिथे ही लोकं विमानं उडवत आहेत, असं डॉन या वृत्तपत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आवश्यक ती शैक्षणिक कागदपत्रे सादर करू न शकल्याने 50 कर्मचाऱ्यांना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलायन्सने निलंबित केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

-अजून किती बळी घेणार?; काँग्रेसचा शिवसेना-भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या